Old Pune-Mumbai highway वर खासगी बस दरीत कोसळली, सात ते आठ जणांचा मृत्यू
Continues below advertisement
Accident : जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर (Old Pune-Mumbai highway) खासगी बस (Private bus) दरीत कोसळल्याची घटना घडली आहे. या बसमध्ये 40 ते 45 लोक होते. यामधील सात ते आठ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. तर 20 ते 25 लोक जखमी झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. बोरघाटातील शिंगरोबा मंदिरजवळ पहाटे चार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
Continues below advertisement