Ola-Uber : ओला - उबर कॅबचालक भाडेवाढीच्या मागणीवर ठाम
Continues below advertisement
Ola-Uber : ओला - उबर कॅबचालक भाडेवाढीच्या मागणीवर ठाम मुंबईत एकीकडे रिक्षा मेन्स युनियननं रिक्षाभाड्यात वाढ करण्याची मागणी केलेली असताना, त्याचवेळी ओला आणि उबर कॅबचालकही भाडेवाढीच्या मागणीवर ठाम आहेत. प्रादेशिक परिवहन प्राधिकरणानं वातानुकूलित टॅक्सीच्या भाडेदरात वाढ केली आहे. पण ओला आणि उबर या अॅप बेस्ड कंपन्यांनी त्याची अंमलबजावणी केलेली नाही. वातानुकूलित टॅक्सीच्या प्रवासात पहिल्या दीड किलोमीटरसाठी ३७ रुपये आणि पुढील प्रत्येक किलोमीटरसाठी २५ रुपये दराचा प्रस्ताव प्रादेशिक परिवहन कार्यालयानं तयार केला होता. या प्रस्तावाला प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली होती. हे नवीन दर जानेवारीत लागू झाले असूनही ओला आणि उबरनं त्या दरांची अंमलबजावणी केलेली नाही, अशी कॅबचालकांची तक्रार आहे.
Continues below advertisement