Sakshma Salgar : सक्षणा सलगर यांच्या वक्तव्यानंतर पक्षाकडून माफी
शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मराठा समाजाची माफी मागितली आहे. पक्षाच्या नेत्या सक्षमा सलगर यांनी काही दिवसांपूर्वी केलेल्या एका वक्तव्यामुळे हा वाद निर्माण झाला. सक्षमा सलगर यांनी लातूर जिल्ह्यातील शिरूर अनंतपाळ येथे बोलताना, कोणीतरी विनाकारण ओबीसी विरोधात याचिका दाखल करायला लावावी आणि कुणाला तरी कोर्टात जायला सांगावे असे म्हटले होते. तसेच, खऱ्या ओबीसींनाच झेडपी आणि महानगरपालिका मिळाली पाहिजे, डुप्लिकेटना तुम्ही घरचा रस्ता दाखवा असेही त्यांनी म्हटले होते. ओबीसींच्या आरक्षणामधला पॉईंट एक टक्काचंही कमी होणार नाही, अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. या वक्तव्याची दखल घेत राष्ट्रवादी काँग्रेसने मराठा समाजाची माफी मागितली आहे.