OBC Reservation टिकवणं आता सर्वस्वी केंद्र सरकारच्या हाती,आयोगाचे माजी सदस्य डॉ बबनराव तायवाडेंची माहिती

ओबीसींचा आरक्षण टिकवणं आता हे सर्वस्वी केंद्र सरकारच्या हातात असल्यामुळे सध्या राज्य सरकारने नेमलेले राज्य मागासवर्गीय आयोग आणि त्या मार्फत केले जात असलेल्या प्रयत्नातून काहीच साध्य होणार नाही... त्यामुळेच राज्य मागासवर्ग आयोगाच्या सदस्य पदावरून राजीनामा दिल्याचे राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य डॉ बबनराव तायवाडे यांनी म्हटले आहे.

ओबीसींचे 27 टक्के आरक्षण वाचवण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी प्रयत्न करावे अशी मागणी ही त्यांनी केली... आज नागपूरात राष्ट्रीय ओबीसी महासंघाने आंदोलन केले... 

महासंघाचे अध्यक्ष डॉ बबनराव तायवाडे यांच्या नेतृत्वात संविधान चौकावर झालेल्या या आंदोलनात मोठ्या संख्येने ओबीसी समाजाचे कार्यकर्ते सहभागी झाले होते... 

ओबीसींचा राजकीय आरक्षण वाचवण्यासाठी केंद्र सरकारने 1) ओबीसींची राष्ट्रीय पातळीवर जनगणना करावी... 2) भारतीय राज्यघटनेच्या कलम 243 द मध्ये सुधारणा करून ओबीसी समाजाला ग्रामपंचायत पासून जिल्हा परिषद व महानगरपालिका पर्यंत सर्वच ठिकाणी 27% राजकीय आरक्षण द्यावे... 3) तसेच केंद्र सरकारने घटनेत दुरुस्ती करून सर्वोच्च न्यायालयाने आखून दिलेली आरक्षणाची 50% त्याची कमाल मर्यादा रद्द करावी अशी मागणी या आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आली...

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola