Vaibahav Khdekar join BJP : मनसे नेते वैभव खेडेकर यांचा भाजप पक्षप्रवेश लांबणीवर

रत्नागिरीचे मनसे नेते वैभव खेडकर यांचा भाजपमधील पक्षप्रवेश लांबणीवर पडला आहे. आज मुंबईत भाजप मुख्यालयात भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम नियोजित होता. काही दिवसांपूर्वीच वैभव खेडकर यांची मनसेमधून हकालपट्टी झाली होती आणि त्यानंतर त्यांचा भाजप प्रवेश निश्चित झाला होता. मात्र, काही कारणास्तव हा पक्षप्रवेश पुढे ढकलण्यात आला. वैभव खेडकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात सध्या ओबीसी आरक्षणाचा मुद्दा सुरू आहे. नागपूरसारख्या ठिकाणी यासंदर्भात आंदोलनं सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला. त्यांच्या म्हणण्यानुसार, "ओबीसी आरक्षणाचा मुद्दा सध्या राज्यात सुरू आहे, त्या पार्श्वभूमीवरती हा निर्णय घेण्यात आलेला आहे." पक्षप्रवेशाची पुढील तारीख लवकरच निश्चित होईल. यात कोणतीही अंतर्गत राजकीय बाब नाही, असेही स्पष्ट करण्यात आले. पुढील दोन ते चार दिवसांत यासंदर्भात अधिक माहिती मिळण्याची शक्यता आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola