OBC Reservation : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत 17 जानेवारीला सुनावणी

Continues below advertisement

OBC Reservation Local Body Election : ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे जाणार की नाही याचा फैसला सुप्रीम कोर्टात 17 जानेवारी रोजी होणार आहे. मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र या दोन्ही राज्यांच्या प्रकरणाची एकत्र सुनावणी सुप्रीम कोर्ट या दिवशी करणार आहे. निवडणुका ओबीसी आरक्षणासह की ओबीसी आरक्षणाशिवाय हा पेच महाराष्ट्र सरकारसमोर उभा राहिला आहे, त्या पार्श्वभूमीवर सुप्रीम कोर्टातली ही सुनावणी महत्वाची असणार आहे. 

निवडणुका घेण्यावरुन राज्य निवडणूक आयोग आणि महाराष्ट्र सरकार यांच्यात सध्या रस्सीखेच सुरु आहे. त्यावरही सुप्रीम कोर्टातून अंतिम शब्द काय येतो हे या सुनावणीत स्पष्ट होणार आहे. 17 डिसेंबर रोजी सुप्रीम कोर्टानं ओबीसी आरक्षणासाठीची त्रिसूत्री पार पाडल्याशिवाय हे राजकीय आरक्षण लागू करता येणार नाही असा आदेश दिला होता. त्यानंतर महाराष्ट्रातल्या 105 नगर पंचायतींच्या निवडणुकाही दोन टप्प्यांत पार पाडण्याची वेळ आली आहे. आयोगाची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत ओबीसीसाठी राखीव जागा या खुल्या प्रवर्गातल्या म्हणूनच गृहीत धरल्या जाव्यात असा आदेश कोर्टानं दिला आहे. त्यामुळे राज्य सरकारसमोर पेच निर्माण झाला. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram