Atul Save Meet OBC Protest | ओबीसी विकासमंत्री अतुल सावे ओबीसी आंदोलकांची भेट घेणार
उपोषण सुरूच असल्याने सरकारची धावधाव सुरू आहे. नाराज ओबीसी आंदोलकांची समजूत काढण्यासाठी ओबीसी विकास मंत्री अतुल सावे नागपुरात दाखल झाले आहेत. थोड्याच वेळात ते आंदोलनस्थळी पोहोचून आंदोलकांची भेट घेणार आहेत. मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे ओबीसींच्या आरक्षणाला कोणताही धक्का लागणार नाही, असे मंत्री सावे यांनी स्पष्ट केले आहे. यामध्ये कोणताही संभ्रम निर्माण करून घेण्याचे कारण नाही, असेही त्यांनी म्हटले आहे. सरकारने मराठा आरक्षणाचा निर्णय भरपूर अभ्यास केल्यानंतर घेतला असल्याचे सावे यांनी सांगितले. ओबीसी आरक्षणावर कोणताही परिणाम होणार नाही, यावर सरकार ठाम आहे. आंदोलकांमध्ये निर्माण झालेला गैरसमज दूर करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.