OBC Reservation Row: जीआर रद्द करा, 2 सप्टेंबरचा जीआर रद्द होईल अशी अपेक्षा; ओबीसी नेत्यांचा इशारा

Continues below advertisement
ओबीसी नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) आणि लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांनी मराठा आरक्षणासंदर्भातील २ सप्टेंबरच्या जीआरला (GR) तीव्र विरोध दर्शवला आहे. 'जोपर्यंत हा जीआर रद्द होणार नाही तोपर्यंत ओबीसी स्वस्थ बसणार नाही आणि ओबीसीच्या मनातला जो संभ्रम आहे तो दूर होणार नाही,' अशी भूमिका ओबीसी नेत्यांनी स्पष्ट केली. या जीआरमुळे ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार असून, ही एकप्रकारे ओबीसींमध्ये घुसखोरी असल्याचा आरोप नेत्यांनी केला आहे. 'जरांगेत पुराण कमी करून सरकारपुरान अधिक आक्रमकपणे करावं लागेल, तरच तो जीआर रद्द होईल,' असे म्हणत लक्ष्मण हाके यांनी संघर्षाची तयारी दर्शवली. मुख्यमंत्र्यांनी यावर लवकरात लवकर कारवाई केली नाही, तर आगामी निवडणुकांमध्ये याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा स्पष्ट इशाराही देण्यात आला आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola