Maratha vs OBC Beed : बीडमध्ये ओबीसी महाएल्गार सभेसाठी येणाऱ्या वाहनांना टोलमाफी

Continues below advertisement
बीडमध्ये होणाऱ्या ओबीसी महाळगार सभेसाठी आमदार धनंजय मुंडे यांच्या मागणीनंतर वाहनांना टोलमाफी जाहीर करण्यात आली आहे. 'प्रत्येक सभेत जिल्ह्याच्या वेशीवर असणाऱ्या टोलनाक्यावर ही मुभा सभेसाठी येणाऱ्या वाहनांना दिली जाते', अशी माहिती राष्ट्रीय महामार्गावरील पाडळसिंगी टोलनाक्याचे मॅनेजर घाडगे यांनी दिली. आमदार धनंजय मुंडे यांनी ही मागणी केल्यानंतर, प्रशासनाने एकत्रितपणे टोलनाक्यावरून जाणाऱ्या वाहनांना हा टोल माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे सभेला येणाऱ्या ओबीसी कार्यकर्त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. बीड जिल्हा मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या राजकारणाचा केंद्रबिंदू राहिला आहे, ज्यामुळे या घडामोडीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola