Pune Land Scam : 'पार्थ पवारांच्या घोटाळ्यावर ‘मुळशी पॅटर्न-२’ काढा', OBC नेते लक्ष्मण हाके यांचा हल्लाबोल

Continues below advertisement
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी पवार कुटुंबावर, विशेषतः उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांचे पुत्र पार्थ पवार यांच्यावर जमीन घोटाळ्याचे गंभीर आरोप केले आहेत. 'पार्थ पवारांच्या गंडलेल्या घोटाळ्यावर मुळशी पॅटर्न दोन चित्रपट बनावा,' असा थेट हल्लाबोल लक्ष्मण हाके यांनी केला आहे. पुण्यातील कोरेगाव पार्कमधील अंदाजे १८०० कोटी रुपयांची 'महार वतन' जमीन पार्थ पवार यांच्या कंपनीने केवळ ३०० कोटी रुपयांत घेतल्याचा आरोप आहे. हाके यांनी पवारांवर सरंजामी राजकारणाचा आरोप करत, 'अजित आणि सुनेत्रा पवारांनी बारामतीच्या सोनगावमधील महारवतन जमीन लाटून पार्थच्या नावे केली,' असेही म्हटले. भविष्यात मरीन ड्राइव्ह, ताज हॉटेल, मलबार हिल्स आणि विधान भवन यांसारख्या मोठ्या मालमत्तांवर हात मारावा, असा उपरोधिक सल्लाही त्यांनी पार्थ पवारांना दिला. या प्रकरणी आता चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola