Maharashtra Corona : महाराष्ट्रात कोव्हिड ॲक्टिव्ह रुग्णसंख्या 900 पार, केंद्राकडून सरकारला पत्र

Continues below advertisement

महाराष्ट्रात वाढते कोरोना रुग्ण लक्षात घेऊन केंद्र सरकारनं महाराष्ट्र सरकारला पत्र पाठवलंय. महाराष्ट्रात कोरोनानं पुन्हा डोकं वर काढलंय.... राज्यात २२६ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झालीए....महाराष्ट्रात कोव्हिड ॲक्टिव्ह रुग्णसंख्या ९०० पार आहे...  राज्यातील कोरोना पाॅझिटिव्हीटी रेट देखील वाढलाय...
कोरोना रुग्णांच्या वाढीबाबत राज्य सरकारने सतर्क राहण्याची सूचना केंद्र सरकारने दिलीय. गाईडलाईन्सनुसार कोरोनाच्या चाचण्या करण्याच्या सूचना देण्यात आल्यायत. परदेशातून येणाऱ्या प्रवाशांच्याही जिनोम टेस्टिंग करण्याबाबत केंद्र सरकारने सुचवलं आहे. महत्त्वाचं म्हणजे, गर्दीच्या ठिकाणी कोरोना नियमांचं पालन होतंय का?, यावरही लक्ष देण्याच्या सूचना देण्यात आल्यायत. दरम्यान, देशाचा कोरोना पॉझिटिव्हिटी रेट ०.६१ टक्के असताना, महाराष्ट्राचा पॉझिटिव्हिटी रेट १.९२ टक्क्यांवर असल्याने केंद्र सरकारने चिंता व्यक्त केलीय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram