आता सुट्टीच्या दिवशी वीजबिल भरणा केंद्र सुरु राहणार, थकबाकी वसुलीला चालना देण्यासाठी निर्णय
Continues below advertisement
राज्यातील वीज ग्राहकांना सुट्टीच्या दिवशीही वीजबिल भरता येणार आहे. ग्राहकांची गैरसोय टाळण्यासाठी महावितरणनं सुट्टीच्या दिवशीही सर्व वीज बिलभरणा केंद्रं सुरु ठेवण्याचा निर्णय घेतलाय. राज्यभरातील वीज ग्राहकांकडे महावितरणचे जवळपास 50 हजार कोटींहून अधिक किमतीची वीज बिलथकबाकी आहे. त्या वसुलीला चालना मिळावी, नोकरदार वीजग्राहकांच्या सोयीसाठी सुट्टीच्या दिवशी वीज बिल भरणा केंद्रं सुरु ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. ग्राहकांनी रोखीनं वीजबिल भरण्याऐवजी महावितरणच्या संकेतस्थळावर ऑनलाईन किंवा मोबाईल अॅपद्वारे वीज बिल भरावं, असं आवाहन करण्यात आलं.
Continues below advertisement