Narayan Rane: नारायण राणे आणि नितेश राणेंना मुंबईच्या मालवणी पोलीस ठाण्याकडून नोटीस ABP Majha

Continues below advertisement

दिशा सॅलियनबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या राणे पितापुत्राविरोधात गुन्हा नोंदवण्यात आल्यानंतर, आता त्यांना मालवणी पोलिसांनी नोटीस बजावली आहे..  नितेश राणेंना ३ मार्चला म्हणजे उद्या , तर नारायण राणेंना ४ मार्चला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश नोटिशीद्वारे देण्यात आलेत.. दिशा सॅलियनवर अत्याचार करुन तिची हत्या करण्यात आल्याचं वक्तव्य नारायण राणेंनी पत्रकार परिषदेत केलं होतं.. त्यानंतर तिच्या पालकांनी नारायण राणे आणि नितेश राणेंविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार केली होती.. या संदर्भात महिला आयोगाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर नारायण आणि नितेश राणेंविरोधात मुंबईच्या मालवणी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आलाय.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram