'गणेशमूर्तीच्या उंचीबाबत मर्यादा नको',मूर्तिकार, गणेशोत्सव मंडळांची मागणी, मार्गदर्शक सूचना कधी जाहीर होणार?

यंदाच्या गणेशोत्सव दरम्यान गणेशमूर्तीच्या उंचीबाबत मर्यादा राज्य सरकारने घालून देऊ नये, अशी मागणी मूर्तिकार आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून केली जात आहे. मागील वर्षी गणेशोत्सव साधेपणाने साजरा करताना 4 फुटापर्यंत गणेशमूर्तीची उंची असावी, अशाप्रकारच्या सूचना राज्य सरकारकडून देण्यात आल्या होत्या. मात्र यावर्षी अशी मूर्तींच्या उंचीबाबत मर्यादा घालू नये, अशी विनंती केली जात आहे. अवघे दोन महिने गणेशोत्सवाला  उरलेले असताना मूर्तिकार चिंतेत आहेत. कारण कुठल्याही प्रकारच्या मार्गदर्शक सूचना अद्याप राज्य सरकारकडून न मिळाल्याने  उंच गणेशमूर्तीची काम मूर्तिकारांनी सुरू केलेली नाही. त्यामुळे याबाबत स्पष्टता सरकारने द्यावी, जेणेकरून ज्याप्रकाराचा संभ्रम मूर्ती साकार करण्याबाबत मूर्तिकारांमध्ये आहे तो दूर होईल.  मूर्तिकारांप्रमाणे हाच संभ्रम मोठ्या सार्वजनिक गणेशोत्सवात मंडळामध्ये सुद्धा आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola