सांगली भ्रूणहत्या प्रकरणात असंवेदनशीलतेचा कळस,5 वर्षे उलटूनही विशेष सरकारी वकीलाची नियुक्ती नाही

Continues below advertisement

सांगली जिल्ह्यातल्या भ्रूणहत्या प्रकरणात प्रशासकीय असंवेदनशीलनेत कळस गाठल्याचं दिसून आलंय. म्हैसाळमध्ये उघड झालेल्या भ्रूणहत्या प्रकरणात पाच वर्षे लोटली तरी सरकारी वकील नियुक्त करण्यात आलेला नाही. त्यामुळे अद्याप न्यायालयीन कामकाजच सुरू होऊ शकलेलं नाही. त्यामुळे या संवेदनशील प्रकरणात सरकार आरोपीवर मेहेरबान आहे की काय असा सवाल उपस्थित करण्यात येतोय. तासगाव तालुक्यातल्या मणेराजुरीतील एका महिलेचा गर्भपाताच्यावेळी मृत्यू झाला होता. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब खिद्रापुरे यांचं भ्रूणहत्येचं रॅकेटच समोर आलं होतं. एका ओढ्यात तब्बल 19 अर्भकांचे अवशेष प्लास्टिकच्या पिशवीत सापडले होते. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब खिद्रापुरेला अटक झाली. पण ५ वर्षे पूर्ण झाली तरी सरकारी वकील नेमला नसल्यानं न्यायालयात प्रकरण पुढे गेलेलं नाही.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram