Nitin Raut : महावितरणचं खासगीकरण होऊ देणार नाही, ऊर्जामंत्री नितीन राऊत यांची ग्वाही
महाविकास आघाडी सरकार महावितरणचं खासगीकरण होऊ देणार नाही अशी ग्वाही ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिलीय. शिर्डीत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी नितीन राऊत यांनी केंद्र सरकारवरही निशाणा साधला. महाविकास आघाडी सरकार राज्यातील जनता आणि वीज वितरण कर्मचाऱ्यांचे हित जपणार असल्याचंही ऊर्जामंत्र्यांनी म्हटलंय. तसंच राज्यात फडणवीस सरकारमुळे वीजबिल थकबाकी 14 हजार कोटींवरुन 71 हजार कोटी झाल्याचा आरोपही राऊत यांनी केलाय.