BJP Politics: 'गडकरींचा भाजपला घरचा आहेर, जुन्या कार्यकर्त्यांवरून कान टोचले Special Report

Continues below advertisement
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूरमधील एका कार्यक्रमात भाजप नेत्यांचे, विशेषतः चंद्रशेखर बावनकुळे यांचे, कान टोचले आहेत. 'जर या प्रामाणिक कार्यकर्त्याची तुम्ही कदर नाही केली तर जेवढ्या जोराने वरती चालल्या तेवढ्या जोराने खाली आल्याशिवाय राहणार नाही', असा थेट इशारा गडकरींनी दिला आहे. पक्षातील इनकमिंगच्या मुद्द्यावरून त्यांनी 'घरची मुरगी डाल बराबर' म्हणत जुन्या आणि निष्ठावान कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष होत असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. यावर प्रतिक्रिया देताना बावनकुळे यांनी गडकरींची सूचना योग्य असल्याचे म्हटले, तर संजय राऊत यांनी गडकरींची वेदना खरी असल्याचे सांगत सध्याच्या भाजपला 'डुप्लिकेट' म्हटले आहे. शिंदे गटानेही गडकरींच्या सल्ल्याचे स्वागत केले आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षात मोठ्या प्रमाणात इनकमिंग होत असल्याने गडकरींच्या या विधानामुळे पक्षांतर्गत चर्चांना उधाण आले आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola