Nitin Gadkari Threat : नितीन गडकरी धमकी प्रकरणी आरोपपत्र दाखल करण्यासाठी पोलिसांना मुदतवाढ
Continues below advertisement
Nitin Gadkari Threat : नितीन गडकरी धमकी प्रकरणी आरोपपत्र दाखल करण्यासाठी पोलिसांना मुदतवाढ केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना धमकी देऊन शंभर कोटी रुपये खंडणी मागितल्याचा आरोप असलेले जयेश पुजारी व अफसर पाशा यांच्याविरुद्ध न्यायालयामध्ये आरोपपत्र दाखल करण्यासाठी आणखी 25 दिवसांची मुदत वाढवून देण्यात आली आहे. नागपूरच्या धंतोली पोलीस स्टेशनमध्ये या आरोपीविरुद्ध युएपीए कायदा अंतर्गत दोन गुन्हे नोंदविले आहेत. पोलिसांनी विशेष सत्र न्यायालयात अर्ज दाखल करून आरोप पत्र दाखल करण्यासाठी आणखी 40 दिवसांची मुदत वाढवून मागितली होती. परंतु न्यायालयाने 25 दिवस वाढवून दिले. यापूर्वी नागपूर पोलिसांना आरोप पत्र दाखल करण्यासाठी 50 दिवस वाढवून देण्यात आले होते.
Continues below advertisement