Nitin Gadkari Pandharpur : पंढरपूर पालखी मार्गाच्या भुमिपुजन सोळ्यातील नितीन गडकरी यांच संपूर्ण भाषण

Continues below advertisement

केंद्रीय मंत्री श्री नितीन गडकरी यांनी पंढरपूरला महाराष्ट्राचे आराध्य दैवत विठुराय चे दर्शन घेतले. पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांच्या हस्ते पंढरपूरला पालखी मार्गासह अनेक विकास कामांचे भुमिपुजन आणि लोकार्पण होत आहे.  केंद्रिय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी आणि केंद्रिय राज्यमंत्री जनरल वी.के. सिंह यांनी आज पंढरपूर येथे विठ्ठलाचे आणि रुक्मिणी मातेचे दर्शन घेतले. याप्रसंगी श्री विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर समितीच्या वतीने केंद्रीय मंत्री नितिन गडकरी आणि राज्यमंत्री सिंह यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मंदिर समितीचे सहअध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर , नगराध्यक्षा साधना भोसले , जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी तथा प्रांताधिकारी गजानन गुरव, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड, समिती सदस्य ह भ प शिवाजी महाराज मोरे,अतुलशास्त्री भगरे, ज्ञानेश्वर महाराज जळगावकर, शकुंतला नडगिरे, माधवी निगडे आदी यावेळी उपस्थित होते. पंढरपूरला जोडणारे पालखी मार्ग आणि राष्ट्रीय महामार्गाच्या भूमिपूजन व लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने केंद्रीय मंत्री नितिन गडकरी हे पंढरपुरात आले होते. यावेळी त्यांनी विठ्ठल मंदिरात जाऊन विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेत मंदिर समितीच्या वतीने सुरू असणाऱ्या विविध उपक्रमांचा आढावा घेतला.

 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram