Nitin Desai Last Rites : शोकाकुल वातावरणात नितीन देसाई यांना एनडी स्टुडिओमध्ये अखेरचा निरोप
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppNitin Desai Last Rites : शोकाकुल वातावरणात नितीन देसाई यांना एनडी स्टुडिओमध्ये अखेरचा निरोप
Nitin Desai Suicide: कला दिग्दर्शक नितीन देसाई (Nitin Desai Suicide) यांनी आत्महत्या केली आहे. त्यांचा मृतदेहाचे शवविच्छेदन जे जे रुग्णालयात केले जाणार आहे. थोड्याच वेळात मृतदेह कर्जत ND स्टुडिओ इथून जे जे हॉस्पिटलकडे नेण्यात येणार आहे. मयूर ठोंबरे यांनी एबीपी माझाला सांगितले की, 'नितीन देसाई दादा यांनी एक चिठ्ठी लिहिली होती. त्यामध्ये त्यांनी लिहिलं की, 6 नंबरचे ग्राउंडच्या इथे त्यांचा अंत्यविधी करण्यात यावा. नितीन देसाई यांनी काही सुपरहिट हिंदी चित्रपटांचे सेट उभारले होते.'1942 अ लव्ह स्टोरी', 'हम दिल दे चुके सनम', 'माचिस', 'देवदास', 'लगान', 'जोधा अकबर' या चित्रपटाचं त्यांनी कला दिग्दर्शन केलं होतं. नितिन देसाई हे मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतलं मोठं नाव होतं. नितीन देसाई यांच्या आत्महत्येनंतर अभिजीत पानसे,अमोल कोल्हे,जितेंद्र जोशी, सुबोध भावे या कलाकरांनी शोक व्यक्त केला. तसेच विनोद तावडे, सुप्रिया सुळे,सुधीर मुनगंटीवार,चित्रा वाघ या राजकीय नेत्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून नितीन देसाई यांना श्रद्धांजली वाहिली आहे.