Nitin Desai Last Rites : बॉलिवूडला भरजरी करणाऱ्या नितीन देसाईंचा विसर, अंत्यविधीला केवळ आमीर खान

Nitin Desai Last Rites : बॉलिवूडला भरजरी करणाऱ्या नितीन देसाईंचा विसर, अंत्यविधीला केवळ आमीर खान

कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई अनंतात विलीन झालेत. मात्र यावेळी आमीर खान आणि आशुतोष गोवारीकर यांच्याशिवाय बॉलिवूडमधील कोणताही सेलिब्रिटी उपस्थित नव्हता. त्यामुळे, ज्यांनी बॉलिवूडला भव्यतेचं कोंदण दिलं, सिनेमाच्या पडद्याला श्रीमंत आणि भरजरी बनवलं, त्या  नितीन देसाईंचा बॉलिवूडला विसर पडल्याची चर्चा सुरू झालीय. आधीच बॉलिवूडने देसाईंना बॉयकॉट केल्याचा आरोप होतोय. त्या पार्श्वभूमीवर नितीन देसाईंना अखेरचा निरोप द्यायला बॉलिवूडमधील इतर सेलिब्रिटींनी पाठ फिरवण्याची जोरदार चर्चा सुरूय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola