Nitesh Rane Varah Jayanti | राणेंना 'वराह' अवतार घेण्याचा सल्ला, राजकीय वर्तुळात खळबळ
मंत्री नितेश राणे यांनी वराह जयंतीबाबत केलेल्या वक्तव्यावरून राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. त्यांच्या या वक्तव्याचा विरोधकांसह सत्ताधारी पक्षातील काही नेत्यांनी समाचार घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी नितेश राणे यांना खोचक सल्ला दिला आहे. मिटकरी यांनी म्हटले आहे की, नितेश राणे आणि त्यांच्या अनुयायांनी वराह जयंतीच्या निमित्ताने संपूर्ण दिवस वराह अवतारामध्ये काढायला हवा. तसेच, त्यांनी वराह जयंतीची सुरुवात स्वतःच्या घरापासून करावी. मिटकरी यांनी पुढे म्हटले की, "वराह जयंती म्हणजे वराहच्या पोस्टरची पूजा नाही प्रत्यक्ष वराह पकडून आणायचे आणि त्यांची पूजा करावी ती त्यांच्या घरातच त्यांनी करावी." राणे यांनी काही वराह पकडून आणून त्यांची पूजा करावी, असेही मिटकरी यांनी सुचवले आहे. या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण तापले आहे.