Political Slugfest : '2 पायावर आलास, स्ट्रेचरवर जाशील', Nitesh Rane यांचा Waris Pathan यांना इशारा

Continues below advertisement
महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा वाक्-युद्ध पेटले असून, भाजप (BJP) आणि एमआयएम (AIMIM) नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. भाजप नेते नितेश राणे (Nitesh Rane) यांनी एमआयएम नेते वारिस पठाण (Waris Pathan) आणि इम्तियाज जलील (Imtiyaz Jaleel) यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. 'दोन पायावर आलास तर स्ट्रेचरवर जाशील, जागा आणि वेळ कळव, तिथे येतो मी,' असा थेट इशारा नितेश राणे यांनी वारिस पठाण यांना दिला आहे. अहिल्यानगरमध्ये झालेल्या सभेत इम्तियाज जलील यांनी नितेश राणेंचा उल्लेख 'चिंटू' तर वारिस पठाण यांनी 'नेपाळी' असा केला होता. याला उत्तर देताना राणे यांनी, 'भोकणारे कुत्रे चावत नाहीत आणि हे तर नसबंदी केलेले पिल्लं आहेत,' अशी टीका केली. दुसरीकडे, एमआयएमचे नेते फारूक शब्बीर यांनी गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांना 'मंगळसूत्र चोर' म्हटल्यावर, पडळकर यांनीही 'छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर या नावांना विरोध करणारे देशविरोधी आहेत,' असे सणसणीत उत्तर दिले.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola