Nitesh Rane: पोलिसांना 24 तास सुट्टी द्या, आणि मग पाहा! नितेश राणे यांचे आव्हान

Continues below advertisement

Nitesh Rane: "देवेंद्र फडणवीस आमचे नेते आहेत. त्यांच्या बाबतीत राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असे वागत असतील तर राष्ट्रवादीचे नेते महाराष्ट्रात कसे फिरतात ते आम्ही बघू. त्यांना जागोजागी चपलांचे हार घालते जातील. त्यानंतर चपला मोजायचे काम त्यांनी करावं, भाजपचे कार्यकर्ते गप्प बसणार नाहीत. 24 तास पोलिसांना सुट्टी द्या आणि मग बघा, असे आव्हान भाजप आमदार नितेश राणे यांनी केले आहे. 

मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात नितेश राणे बोलत होते. यावेळी त्यांनी पिंपरी-चिंचवड येथे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या गाडीवर चपल फेकण्यात आलेल्या प्रकारावरून राष्ट्रवादीला आव्हान दिले. नितेश राणे यांनी यावेळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावरही टीका केली.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram