Nitesh Rane on Nashik Kumbhmela : कुंभमेळ्यावरून वाद, फक्त हिंदूंनाच व्यवसायाची परवानगी?

Continues below advertisement
नाशिकमध्ये २०२७ साली होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यावरून (Nashik Kumbh Mela) आता एक नवा वाद सुरू झाला आहे. भाजप नेते आणि मंत्री नितीश राणे (Nitesh Rane) यांनी कुंभमेळ्यात फक्त हिंदूंचीच दुकानं असावीत, अशी मागणी केली आहे, ज्याला नाशिकमधील साधू-महंतांनी पाठिंबा दिला आहे. 'आपल्या खाद्यपदार्थांमध्ये लगवी करणं किंवा प्रसादावरती थुंकणं, अशा मंडळींना कुंभमेळ्याच्या परिसरात कुठल्याही व्यवसायाला परवानगी देऊ नये,' या शब्दात साधूंनी राणेंच्या घोषणेचे स्वागत केले आहे. ज्यांना हिंदू धर्म मान्य नाही, अशा लोकांवर कुंभमेळ्याच्या काळात व्यावसायिक निर्बंध आणावेत, अशी मागणी सरकारकडे करण्यात आली आहे. नितीश राणे यांनी म्हटले की, कुंभमेळा हा हिंदूंचा उत्सव आहे आणि तिथे इतर धर्मियांच्या दुकानांची गरज नाही. या वादामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हिंदुत्वाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola