Dhurla Nivdnukicha : महायुतीत बिघाडी? स्थानिक निवडणुकीवरून नेत्यांचे स्वबळाचे इशारे
Continues below advertisement
महाराष्ट्रातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये धुसफूस सुरू झाली आहे. जळगाव, नंदुरबार आणि नाशिकमध्ये भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गटाच्या नेत्यांनी स्वबळावर लढण्याचे संकेत दिले आहेत. 'जागावाटपाचा तोडगा निघाला नाही तर स्वतंत्रपणे निवडणुका लढविण्याची तयारी सुरू केली आहे', असे वक्तव्य भाजप नेते गिरीश महाजन यांनी जळगावात केले आहे. नंदुरबारमध्ये भाजप नेते विजयकुमार गावित यांनी स्वबळाचा नारा दिल्यानंतर, आमदार आमश्या पाडवी यांच्या नेतृत्वात अनेक भाजप पदाधिकाऱ्यांनी शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. येवल्यातही राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत माजी खासदार समीर भुजबळ यांनी स्थानिक परिस्थिती पाहून युती किंवा स्वबळावर निर्णय घेतला जाईल, असे स्पष्ट केले. नाशिकमध्येही शिंदे गटाच्या युवासेनेने स्वबळाची तयारी सुरू केल्याने महायुतीतील जागावाटपाचा तिढा वाढला आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement