Nitesh Rane : Uddhav Thackeray यांनी बाळासाहेबांना धमकी दिली की जर नारायण राणे थांबले तर...

Continues below advertisement

जर नारायण राणे शिवसेनेत थांबले, तर मी बायको-मुलांसोबत मातोश्रीवरून बाहेर निघून जाईन, अशी धमकी उद्धव यांनी बाळासाहेबांना दिली होती असा गौप्यस्फोट नितेश राणे यांनी केला. मनसेप्रमुख राज ठाकरेंनी काल शिवाजी पार्कच्या सभेत नारायण राणेंनी सेना कशी सोडली? उद्धव ठाकरेंचा रोल काय? याबात एक एक करुन सगळा किस्सा सांगितलं. यासोबतच बाळासाहेब ठाकरे आणि नारायण राणे आणि त्यांच्या दरम्यानच्या फोनचा किस्सा सांगितला. यावरच नारायण राणेंची चिरंजीव नितेश राणे यांनी मोठा दावा केला. राज ठाकरेनी नारायण राणेंबद्दल जे सांगितंल ते पूर्ण खरं असल्याचं नितेश राणे म्हणाले. ज्याप्रमाणे राज आणि उद्धव ठाकरे ओबेरॉयमध्ये भेटले होते, त्याचप्रमाणे नारायण राणे हे उद्धव ठाकरेंना कोकणात भेटले आणि त्यावेळी आपल्याला पक्षप्रमुख पद नको असं उद्धव ठाकरेंना स्पष्टपणे सांगितलं होतं पण तरीही हे कटकारस्थान रचण्यात आल्याचा गौप्यस्फोट नितेश राणेंनी केला.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram