Nitesh Rane : रिफायनरी प्रकल्पावरुन नितेश राणेंचा सरकारवर निशाणा ABP Majha

Continues below advertisement

कोकणातला प्रस्तावित रिफायनरी प्रकल्प नाणारमधून बारसू गावात स्थलांतरित करण्याची तयारी राज्य सरकारनं केलीय......याबाबतचं पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केंद्र सरकारला लिहिलंय...
पण जिथं हा प्रकल्प होणार आहे..तिथल्या जागांची खरेदी अनेक राजकारणी आणि धनदांडग्यांनी आधीच केल्याची माहिती एबीपी माझाच्या पडताळणीत उघड झालीय..
बारसू गावानजीकची, म्हणजेच प्रकल्पाच्या बाजूला असलेल्या गावांमधल्या ५०० ते ६०० एकर जागेची खरेदी आधीच झाल्याची माहिती आहे...
बारसू गावात प्रकल्प होणार हे राजकारणी आणि धनदांडग्यांना आधीच माहित होतं...त्यामुळं याची कुणकुण स्थानिकांना लागायच्या आधीच इथल्या जमिनीची खरेदी झाली..अतिशय कवडीमोल भावात या जमिनी खरेदी केल्या गेल्या...एबीपी माझाच्या पडताळणीत ही धक्कादायक माहिती उघड झालीय...

दरम्यान या सगळ्या प्रकरणावर भाजप आमदार नितेश राणे यांनी काय प्रतिक्रिया दिलीय..पाहुयात

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram