Nitesh Rane: नितेश राणे यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर उद्या दुपारी 3 वाजता निर्णय ABP Majha

Nitesh Rane : सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणूक रणधुमाळीत शिवसेना कार्यकर्ते संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ल्या प्रकरणी भाजप आमदार  वादात अडकले आहेत. हल्ल्या प्रकरणी भाजप आमदार नितेश राणे यांच्या नियमित जामीन अर्जावर सिंधुदुर्ग कोर्टात सुनावणी सुरु आहे. आजच्या सुनावणीत दोन्ही बाजूंचा युक्तिवाद संपला असून कोर्ट आपला निर्णय उद्या (मंगळवारी) दुपारी 3 वाजता सुनावणार आहे. यावेळी सरकारी वकील म्हणून प्रदीप घरत यांनी युक्तीवाद केला. तर संतोष परब यांच्याकडून वकील विलास पाटील शिरगावकर आणि नितेश राणे यांच्यातर्फे वकील सतीश मानशिंदे यांनी युक्तिवाद केला. आर. बी. रोटे यांच्या न्यायालयात ही सुनावणी पार पडली.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola