Nitesh Rane : नितेश राणेंच्या जामीन अर्जावर सुनावणीदरम्यान सरकारी वकील अनुपस्थित, काय होणार सोमवारी
Nitesh Rane : सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणूकीदरम्यान शिवसेनेच्या संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी दोन दिवस पोलीस कोठडीत असणाऱ्या आमदार नितेश राणे यांना सध्या न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. आमदार नितेश राणे यांना 18 फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यानंतर आज त्यांच्या छातीत दुखत असल्यानं त्यांना कोल्हापूर येथे हलवण्यात येणार होतं. त्यामुळे आज सुनावणी होणार नव्हती मात्र अखेर सुनावणी सुरु झाली असून दोन्ही बाजूच्या वकिलांनी आपल्या बाजू मांडल्यानंतर आता जामिन अर्जावरील उर्वरीत सुनावणी ही सोमवारी होणार आहे. शिवाय सरकारी वकील प्रदीप घरत यांनी आमदार नितेश राणे यांची सुनावणी सिंधुदुर्ग सत्र न्यायाधीश रोटे यांच्या समोर न करता, शिवसैनिक संतोष परब हल्ला प्रकरणाची ज्या न्यायाधीशांसमोर सुनावणी सुरू आहे, त्यांच्या समोरच घ्यावी असा अर्ज केला असून त्यावरील सुनावणी देखील सोमवारी होणार आहे.