Nitesh Rane : नितेश राणे यांना शरण येण्यास सर्वोच्च न्यायालयाकडून दहा दिवसांची मुदत : ABP Majha
Continues below advertisement
Nitesh Rane : भाजप आमदार नितेश राणे यांना सुप्रीम कोर्टात मोठा धक्का बसला आहे. सुप्रीम कोर्टाने नितेश राणे यांना जिल्हा न्यायालयात 10 दिवसात शरण येण्याचे आदेश दिले आहेत. मुंबई उच्च न्यायालयाने नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला होता. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाविरोधात नितेश राणे यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. नितेश राणे यांना अटकेपासून 10 दिवसांचे संरक्षण मिळाले आहे.
Continues below advertisement