Chitra Wagh : मविआ सरकारच्या मंत्र्यांच्या ताफ्यातही निर्भया पथकाची वाहनं होती- चित्रा वाघ

Continues below advertisement

निर्भया निधीतून खरेदी करण्यात आलेली २२० पैकी ४७ वाहनं ही शिंदे-फडणवीस सरकारनं बंडखोर आमदार आणि खासदारांच्या सुरक्षेसाठी दिल्याचा आरोप ठाकरेंच्या शिवसेनेकडून करण्यात येत आहे. त्याच आरोपांना भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी आज पत्रकार परिषद घेऊन प्रत्युत्तर दिलं. चित्रा वाघ यांनी या पत्रकार परिषदेत राज्य सरकारवरचा आरोप खोडून काढण्याचा प्रयत्न केलाच, पण उल्टा चोर कोतवाल को डाटे असं म्हणून मविआ सरकारवरच प्रत्यारोप केला. छगन भुजबळ, विजय वडेट्टीवार, सुनील केदार, सुभाष देसाई आणि सुप्रिया सुळे यांच्या ताफ्यातही निर्भया पथकाची वाहनं होती, असं चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram