Nilesh Chavhan Gun Permission : परवान्याचा ट्रिगर? निलेश चव्हाणला शस्त्रपरवाना कुणाच्या आशिर्वादानं?
Nilesh Chavhan Gun Permission : परवान्याचा ट्रिगर? निलेश चव्हाणला शस्त्रपरवाना कुणाच्या आशिर्वादानं?
एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट. सर्वसामान्यांना अनेक कामांसाठी सरकारी कार्यालयात, मंत्रालयात अनेक खेपा माराव्या लागल्यात, मात्र एका गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्याला शस्त्र परवाना मात्र सहज कसा मिळतो असा प्रश्न अनेकांना पडला. वैष्णवी हगवणे प्रकरणातील संशयित निलेश चव्हाणला अनेक गुन्हे दाखल असताना पिस्तुलाचा परवाना मिळाला, तोही मंत्रालयातील कनेक्शन मुळे. ठाण्यात हाणामारीच्या प्रकरणात अदखलपात्र गुन्हा दाखल आहे. 2021 मध्ये हिंजवडी पोलीस ठाण्यात ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. मे 2022 मध्ये स्पाई कॅमेरा लावून आक्षेपार शूटिंग केल्याचा निलेशच्या पत्नीने आरोप केला होता. पत्नीच्या तक्रारीनंतर वारजे पोलीस ठाण्यात त्याच्यावर गुन्हा दाखल झाला. निलेश चव्हाण 2022 मध्ये शस्त्र परवाण्यासाठी अर्ज केला होता. मात्र पत्नीन केलेल्या आरोप. मुळे पुण्याच्या तत्कालीन आयुक्तांनी त्याचा शस्त्र परवाण्याचा अर्ज फेटाळून लावला. पुणे पोलीस आयुक्तालय अर्ज फेटाळला मात्र त्यानंतर निलेशन मंत्रालयात अर्ज केला. तत्कालीन गृहराज्यमंत्री सतेज पाटलांसमोर पुणे पोलिसांकडून अहवाल सादर करण्यात आला. पुणे पोलिसांच्या अहवालात निलेश चव्हाणवरील गुन्ह्यांची माहिती गायब दाखवण्यात आली. गृह राज्यमंत्री सतेज पाटलांना देण्यात आलेल्या फाईल मध्ये गुन्हे निरंक दाखवण्यात आले. आणि त्यामुळे मंत्रालयातून निलेश चव्हाणला शस्त्र परवाना मिळाला. पोलिसांनी शस्त्र परवाना नाकारल्यानंतर मंत्रालयात अपील करण्याची मुभा असते. मात्र त्यानंतर मंत्रालय उपसचिव किंवा गृह राज्यमंत्री यांच्या पातळीवर सुनावणी होऊन शस्त्र परवाण्या संदर्भात निर्णय घेतला जातो. त्यामुळे निलेश चव्हाण शस्त्र परवाना प्रकरणात माझान काही सवाल उपस्थित केले आहेत. गुन्हे दाखल असताना निलेश चव्हाणला परवाना मिळालाच कसा? मंत्र्यांसमोर सादर केले. झालेल्या प्रश्नांची उत्तर मिळणार का? गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या निलेशला मदत करणारे मंत्रालयातील अधिकारी, मंत्री यांची नाव समोर येणार का? हे पाहणं महत्त्वाच ठरेल.