Pune Hagawane JCB Case : अटकेतील बँकेचे एजंट शशांक हगवणेच्या कटात सहभागी?

Pune Hagawane JCB Case : अटकेतील बँकेचे एजंट शशांक हगवणेच्या कटात सहभागी?

वैष्णवी हगवणेला (Vaishnavi Hagawane death) मृत्यू प्रकरणांतर आता हगवणेच्या गळ्याभोवती कारवाईचा फास आवळला जात आहे. प्रशांत येळवंडेकडून जेसीबी जप्त करण्यापासून ते स्वतःकडे ताबा घेण्यापर्यंत हगवणे माय-लेकाने कट रचल्याचं आता पोलीस तपासात समोर आलं आहे. थकीत कर्ज असलेला जेसीबी आम्ही येळवंडेकडून जप्त केला नाही, असा खुलासा आधी इंडस इंड बँकेने केला होता. तर आता जप्त केलेला जेसीबी ज्या गोडाऊनमध्ये ठेवला जातो त्या रणजित आणि भूषण खांडेभराड यांनी देखील जेसीबी गोडाऊनमध्ये आला नाही असं सांगत हगवणेंची (Vaishnavi Hagawane death) पोलखोल केली आहे. येळवंडेकडून जप्त करण्यात आलेला जेसीबी आमच्या गोडाऊनपर्यंत पोहचलाच नाही, अशी माहिती खांडेभराडांनी पोलीस चौकशीत दिली आहे. त्यामुळं येळवंडेकडून जेसीबी जप्त करणारे भामटे हे हगवणेची माणसं होती आणि हा कटाचा भाग होता, हे समोर आलं आहे. तर जेसीबी जप्त करणारे हगवणेचे तीन भामटे एजंट यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola