Nikita Sawant Accident: 'निकिता सावंतवर लग्नाआधी काळाचा घाला', कुटुंबावर दुःखाचा डोंगर

Continues below advertisement
मुंबईहून आपल्या लग्नाची पत्रिका वाटण्यासाठी गावी आलेल्या निकिता सावंत हिचा भीषण अपघात झाला. या अपघातात निकिताचा जागीच मृत्यू झाला, तर तिचा भाऊ किरकोळ जखमी झाला आहे. 'पत्रिका वाटप सुरू असतानाच काळानं घाव घातल्यानं सावंत कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला,' असं सांगण्यात आलं आहे. येत्या तीन फेब्रुवारीला निकिताचं लग्न होणार होतं, मात्र नियतीनं तिच्या आयुष्याचा अंत केला. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे. लग्नाच्या तयारीत असलेल्या कुटुंबावर अचानक दुःखाचा डोंगर कोसळल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola