Zero Hour Sarita Kaushik : शनिवार वाड्याच्या नावावर जे होतंय ते निव्वळ राजकारण- सरिता कौशिक
Continues below advertisement
महाराष्ट्राच्या राजकारणात 'शनिवार वाडा' प्रकरणावरून सुरू असलेल्या वादावर 'एबीपी माझा'च्या कार्यकारी संपादिका सरिता कौशिक यांनी सविस्तर भूमिका मांडली आहे. 'खरंतर आपला धर्म धार्मिक स्थानांवर किंवा आपल्या घरात किंवा त्यासाठीच्या नियोजित स्थानांवरच पाळायला हवा. हे हिंदूंनाही लागू आहे, हे मुसलमानांनाही आणि हेच शनिवारवाड्यालाही लागू होतं,' असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले. पूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात हिंदू-मुस्लीम ध्रुवीकरण निर्णायक नव्हते, मात्र आता प्रत्येक पक्ष मतदार डोळ्यासमोर ठेवून भूमिका घेत असल्याचे त्यांनी म्हटले. काँग्रेसच्या काळात मुसलमानांचे लांगूलचालन होत असल्याचा आरोप भाजपने यशस्वीपणे लोकांच्या मनात रुजवला, ज्यामुळे राजकीय समीकरणे बदलली. सध्या शनिवार वाड्याच्या नावाखाली जे सुरू आहे, ते निव्वळ राजकारण असल्याचे मत सरिता कौशिक यांनी मांडले.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement