Maharashtra Coronavirus Updates | राज्यात मध्यरात्रीपासून जमावबंदी; रात्री 8 वाजल्यापासून सकाळी 7 वाजेपर्यंत निर्बंध लागू
Maharashtra Coronavirus Updates शुक्रवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत दूरदृश्य प्रणालीद्वारे पार पडलेल्या बैठकीत महाराष्ट्रातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. राज्यात सातत्यानं वाढणारे कोरोना रुग्णांचे आकडे पाहता सरकारकडून Mission Begin Again काही नवे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. यामध्ये राज्य शासनानं लॉकडाऊनचा पर्याय तूर्तास दूरच ठेवला आहे ही बाब महत्त्वाची. 27 मार्चच्या मध्यरात्रीपासून लागू होणारे हे निर्बंध 15 एप्रिलपर्यंत लागू असणार आहेत. नव्या नियमावलीनुसार राज्यात रात्रीच्या जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. ज्यामध्ये पाचहून अधिक लोकांना एकत्र येण्यास बंदी असेल. रात्री 8 ते सकाळी 7 पर्यंत जमावबंदी कायम असेल. यामध्ये नाक आणि तोंड झाकण्यासाठी मास्कचा वापर करणे, सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणे या नियमांचं पालन अनिवार्य असेल.