NIA Raids on PFI : देशभरात केंद्रीय यंत्रणांचे छापे, पीएफआयच्या शेकडो कार्यकर्त्यांना अटक

पीएफआय म्हणजे पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेविरोधात एनआयएनं आज पुन्हा एकदा कारवाई सुरु केलीय. महाराष्ट्रासह ८ राज्यांत  एनआयएनं छापे टाकलेत. महाराष्ट्रात औरंगाबाद, सोलापूरसह ५० ते ५५ ठिकाणी छापासत्र सुरु आहे. मराठवाडा आणि विदर्भातून आतापर्यंत २१ ते २२ जणांना ताब्यात घेण्यात आल्याचं कळतं. औरंगाबादमध्ये १३ ते १४ कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. तर सोलापुरातही एका संशयिताला ताब्यात घेतल्याची माहिती मिळतेय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola