NIA Raid : आयसिस कनेक्शनवरुन देशभरात एनआयएची छापेमारी, कोल्हापूरच्या हुपरीमधून एकजण ताब्यात
आयसिस कनेक्शनवरुन देशभरात एनआयएने छापे टाकले.. सहा राज्यांमध्ये एकूण १३ ठिकाणांवर एनायएने छापे मारलेत.. महाराष्ट्रात कोल्हापूर आणि नांदेडमध्येही एनआयएने ही कारवाई केलीय. कोल्हापुरातील हुपरी इथून एनआयएने दोन संशयितांना ताब्यात घेतलंय...हुपरीमध्ये पहाटे चार वाजता ही कारवाई करण्यात आली. या कारवाईबाबत स्थानिक पोलिसांना कोणतीही माहिती नसल्याचं समोर आलंय. तर तिकडे नांदेडच्या इतवारी परिसरातून तीन संशयितांना ताब्यात घेण्यात आलंय..