Flash Flood Warning: New York मध्ये पावसाचा कहर, 2 जणांचा मृत्यू

Continues below advertisement
अमेरिकेच्या न्यूयॉर्क (New York) शहरात मुसळधार पावसाने थैमान घातले असून 'फ्लॅश फ्लड वॉर्निंग' (Flash Flood Warning) जारी करण्यात आली आहे. महापौर एरिक अॅडम्स (Mayor Eric Adams) यांनी परिस्थितीवर चिंता व्यक्त केली आहे. 'जेवढा पाऊस पडत होता, ते पाहता आमची गटार व्यवस्था ते हाताळण्यासाठी बनलेली नाही,' असं वक्तव्य महापौर एरिक अॅडम्स यांनी केलं आहे. मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक भागांत पाणी साचले असून, विशेषतः वर्ल्ड ट्रेड सेंटर (World Trade Center) जवळील परिसरात पाणी साचल्याने भीतीचे वातावरण आहे. या वादळी पावसामुळे दोन नागरिकांचा तळघरात पाणी शिरल्याने मृत्यू झाला आहे. सेंट्रल पार्कमध्ये १९१७ नंतरचा, तर लागार्डिया विमानतळावर १९५५ नंतरचा विक्रमी पाऊस नोंदवला गेला. शहरात बचावकार्य सुरू असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola