VVIP Culture: '...हा ताफा Uddhav Thackeray यांचा आहे', समजताच पोलीस नरमले; दंडाऐवजी फक्त समज

Continues below advertisement
दक्षिण मुंबईत (South Mumbai) उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या ताफ्यातील खासगी गाड्यांवर बेकायदेशीरपणे सायरन वापरल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. वाहतूक विभागाचे पोलिस सहआयुक्त अनिल कुंभारे (Anil Kumbhare) यांनी 'अशी कोणतीही घटना घडली नसल्याचं' स्पष्ट केलं असलं तरी, या घटनेची पोलिस विभागात दिवसभर चर्चा होती. एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर महाराष्ट्र टाइम्सला माहिती दिली की, गुरुवारी उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यातील तीन खासगी वाहनांवर सायरन वाजवला जात होता. वाहतूक पोलिसांनी ही वाहने अडवल्यावर तो ताफा उद्धव ठाकरेंचा असल्याचे समजताच, दंडात्मक कारवाई करण्याऐवजी चालकांना केवळ समज देऊन सायरन काढून ठेवण्यास सांगण्यात आले. नियमांनुसार, मुख्यमंत्री आणि काही अतिमहत्त्वाच्या व्यक्ती वगळता इतरांना सायरन वापरण्याची परवानगी नाही आणि उल्लंघन केल्यास दंडात्मक कारवाई केली जाते.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola