Jan Ashirwad Yatra : नव्या केंद्रीय मंत्र्यांची उद्यापासून महाराष्ट्रात जनआशीर्वाद यात्रा
मोदींच्या मंत्रिमंडळात नव्याने समावेश झालेले हे नेते महाराष्ट्रभर जन आशीर्वाद यात्रा काढणार आहेत. आपापल्या मतदार संघात न जाता इतर जिल्ह्यात या मंत्र्यांचा दौरा असणार आहे. लोकांशी संवाद साधण्यासोबतच केंद्रातील योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी या मंत्र्यांवर आहे आणि त्यासाठी भाजपनं देशभर हा कार्यक्रम आखला आहे.