Amravati : स्वातंत्र्य दिनानिमित्त मेळघाटचं विहंगम दृष्यं! स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण

Continues below advertisement

आज आपण स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण करतोय. मेळघाटातील सृष्टीसौंदर्यासोबतच तेथील स्वातंत्र्यदिवसही हा आनंदाच्या सप्तरंगांची उधळण करणारा. स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून मेळघाटचं असंच वेगळं रूप खास 'माझा'च्या प्रेक्षकांसाठी आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. मेळघाटमधील काही मनमोहक विहंगम दृष्य ड्रोनच्या साहाय्याने टिपलं आहे फक्त एबीपी माझा'च्या प्रेक्षकांसाठी डोळ्याचं पारणं फेडणारे हे व्हिडीओ आमचे अमरावतीचे प्रतिनिधी प्रणय निर्बाण आणि त्यांचे ड्रोन सहकारी राहुल ढवळे यांनी टिपले असून स्वातंत्र्य दिनाच्या पर्वातील मेळघाटमधील अशीच जगावेगळी दृ्ष्य आता आपण पाहणार आहोत.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram