Prashant Kadam | काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांची नाराजी दूर, मंत्रीपदाचा पदभार स्विकारणार | ABP Majha

Continues below advertisement
राज्यात खातेवाटप जाहीर झाल्यानंतर गेल्या पाच दिवसांपासून नाराज असलेले काँग्रेसचे विजय वडेट्टीवार यांची नाराजी अखेर दूर झाली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी दिल्ली भेटीत तातडीने सूत्रं हलवल्याने वडेट्टीवर यांच्या नाराजीचा प्रश्न मोडीत निघाला आहे. बाळासाहेब थोरात काल (9 जानेवारी) रात्री उशिरा बाळासाहेब थोरात दिल्लीत दाखल झाले. काल आणि आज सकाळी त्यांनी काँग्रेसच्या के सी वेणुगोपाल आणि इतर ज्येष्ठ नेत्यांशी चर्चा केली. त्यानंतर फोनवरुन वडेट्टीवार यांचं पक्षश्रेष्ठींशी बोलणं करुन दिलं. त्यामुळे वडेट्टीवार यांची नाराजी दूर झाली आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram