Bacchu Kadu Vs Radhakrishna Vikhe : गाडी फोडण्यावरून बक्षिसांचे राजकारण,बच्चू कडूंची गाडी फोडणाऱ्याला 3 लाखांची ऑफर

Continues below advertisement
राज्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांच्या कर्जमाफीवरील वक्तव्यामुळे सुरू झालेला वाद आता नव्या पातळीवर पोहोचला आहे. प्रहार संघटनेचे बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी विखे पाटलांची गाडी फोडणाऱ्यास एक लाखाचे बक्षीस जाहीर केल्यानंतर, आता एका चर्चेदरम्यान विखे पाटील समर्थकाने विरोधकालाच थेट इशारा दिला आहे. 'तुमची गाडी जर बुडाली ना साहेब, मी पण तीन लाख रुपये जाहीर केले', असा थेट पलटवार या समर्थकाने केला. या चर्चेदरम्यान 'तुम्ही विखे पाटलांचे गुलाम आहात' असा आरोप झाल्यानंतर समर्थक संतापला आणि आपण गुलाम नसून निष्ठावान कार्यकर्ते असल्याचं त्याने बजावलं. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून सुरू झालेल्या या शाब्दिक चकमकीमुळे राजकीय वातावरण आणखी तापले आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola