Sachin Sawant On MNS Yuti : इंडिया आघाडीच्या नेत्यांसोबत चर्चा करणार, मनसेसोबत युती नाहीच
Continues below advertisement
नाशिकमध्ये (Nashik) आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी (Local Body Elections) महाविकास आघाडीने (MVA) मनसेसोबत (MNS) युती केल्याच्या घोषणेमुळे काँग्रेसमध्ये (Congress) मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. काँग्रेस नेते सचिन सावंत (Sachin Sawant) यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे. 'काँग्रेस पक्षानं मनसेबरोबर जाण्याचा कोणताही निर्णय घेतलेला नाही', असे सचिन सावंत यांनी ठामपणे सांगितले. त्यांनी म्हटले की स्थानिक नेत्यांना केवळ इंडिया आघाडीतील (INDIA Alliance) पक्षांशीच चर्चा करण्याचे अधिकार दिले होते. दुसरीकडे, पत्रकार परिषदेत उपस्थित असलेल्या काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी वरिष्ठांच्या सूचनेनुसारच ही घोषणा केल्याचा दावा केल्याने पक्षांतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. त्यामुळे परस्पर निर्णय घेणाऱ्या स्थानिक नेत्यांवर पक्षश्रेष्ठी कारवाई करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement