Maharashtra : महाराष्ट्रात भाजपची नवी कार्यकारिणी जाहीर, आशिष शेलार मुंबई भाजप अध्यक्ष
राज्यातील मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर भाजपने आज नव्या कार्यकारिणीची घोषणा केलीय. चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी तर आशिष शेलार यांच्याकडे मुंबईची जबाबदारी देण्यात आली आहे. भाजपच्या चंद्रकांत पाटील यांची मंत्रिमंडळात वर्णी लागल्यानंतर भाजपने ही नवीन कार्यकारिणी जाहीर केली आहे. चंद्रकांत पाटील यांची मंत्रीपदावर वर्णी लागताच भाजप प्रदेशाध्यक्ष धुरा चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सोपवण्यात आलीय.. तर आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुका लक्षात घेता आशिष शेलार यांच्याकडे मुंबई अध्य़क्षपदाची जबाबदारी सोपवलीय..
Tags :
Maharashtra News Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv