Latur Neet Exam Scam : अटक,चौकशी,तपास आणि मौन! लातूर NEET प्रकरणाची AटूZ कहाणी

Continues below advertisement

NEET पेपर लिक प्रकरणात आरोपींनी परीक्षा जाहिर झाल्यापासूनच आरोपींनी  या परीक्षेत विद्यार्थ्यांना आकर्षित करण्यासाठी व्हाॅट्स अॅप ग्रुप बनवले होते.  कुठलिही परीक्षा जाहिर झाली की ही टोळी विविध राज्यातील जिल्ह्यात  व्हाॅट्स अॅप ग्रुप बनवून विद्यार्थ्यांना ती परीक्षा गैरमार्गाने उतीर्ण करून देण्याचे आश्वासन देते  चार टप्यात ही परीक्षेत विदयार्थ्यांना मदत करण्याचे आश्वसन दिले होते.  १) पेपर लिक करणे, २) पेपरला डमी उमेदवार पाठवणे, ३) परीक्षा केंद्र ठरवून देणे ४) दिलेला पेपर हा मागच्या दाराने स्विकारून  त्याची बरोबर उत्तर देऊन पून्हा परीक्षा केंद्रात ठेवणे  यातील ज्या प्रकारे विद्यार्थाला परीक्षा उतीर्ण व्हायचे आहेत. त्यातील रिक्सनुसार पैशांचे रेट ठरवण्यात  आले आहेत.  या टोळीच्या व्हाॅट्स ग्रुपवरील चॅटही पोलिसांच्या हाती लागले असून अनेक विद्यार्थ्यांनी लाखो रुपये आरोपींना आगाऊ पैसे दिलेले आहेत  तर चॅटमध्ये काही विद्यार्थी आरोपींकडे दिलेल्या पैशांची मागणी देखील करत आहे. यात बाहेरील राज्यातील मुलांकडूनही पैसे स्विकारल्याचे तपासात समोर आले आहे.   एका विद्यार्थ्याकडून लाखो पैसे उकळले असून यापूर्वीही अनेक परीक्षांमध्ये या टोळीने गैरव्यवहार केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्या अनुशंगनेही पोलिस तपास करत आहेत  यात अन्य आरोपींचाही सहभाग असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून देण्यात आली असून महाराष्ट्र दहशतवाद पथकाने हा गुन्हा उघडकीस आणला आहे.  मात्र या प्रकरणाचा पुढील तपास हा लातूरचे पोलिस करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram