NDA मध्ये महिलांच्या प्रवेशाबाबत सुप्रीम कोर्टाची कडक भूमिका, प्रवेश परीक्षेमध्ये महिलांना समाविष्ट करावं लागणार

Continues below advertisement

नवी दिल्ली : राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी अर्थात एनडीएमध्ये (NDA) महिलांच्या प्रवेशाबाबत सुप्रीम कोर्टाने चांगलीच कडक भूमिका घेतली आहे. केंद्र सरकारने 2022 पासून प्रवेश परीक्षा आणि 2023 पासून प्रत्यक्ष प्रवेश द्यायची तयारी केली आहे.  पण सुप्रीम कोर्टाने केंद्राची तयारीसाठी वेळ देण्याची मागणी धुडकावली आहे. यावर्षीच्या प्रवेश परीक्षेमध्येच महिलांना समाविष्ट करावे लागणार आहे. आम्ही महिलांच्या आशा वाढवून ठेवल्या आहेत आता त्यांना निराश करणं योग्य नाही असं म्हणत खंडपीठाने फटकारले आहे.  या सुनावणीच्या सुरुवातीला ही महिलांना एनडीएमध्ये प्रवेश द्यायला केंद्र सरकारची तयारी नव्हती.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram