NDA Student Suicide: NDA मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याची आत्महत्या, सिनियर्सकडून छळाचा आरोप?
Continues below advertisement
पुण्यातील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमध्ये (NDA) प्रशिक्षण घेणाऱ्या अंतरिक्ष कुमार या विद्यार्थ्याच्या आत्महत्येमुळे खळबळ उडाली आहे. 'आत्महत्या करण्याची वेळ का आली, याचं कारण आम्हाला कळायलाच हवं,' अशी मागणी करत कुटुंबीयांनी वरिष्ठ कॅडेट्सवर छळाचा आरोप केला आहे. या आरोपांमुळे या प्रकरणाला गंभीर वळण लागले आहे. काही दिवसांपूर्वीच वरिष्ठांकडून होणाऱ्या त्रासाबद्दल तक्रार करूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा दावा नातेवाईकांनी केला आहे. या प्रकरणी एनडीएने 'कोर्ट ऑफ इन्क्वायरी'चे आदेश दिले आहेत, तर उत्तम नगर पोलीस या घटनेचा सखोल तपास करत आहेत. अंतरिक्षच्या खोलीतून कोणतीही सुसाईड नोट सापडली नसल्याने आत्महत्येमागील नेमकं कारण पोलीस तपासानंतरच स्पष्ट होईल.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement